BY – युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
कौलालांपुर, मलेशिया येथे संपन्न झालेल्या मिस ब्युटी युनिव्हर्स
२०२० या सौंदर्य स्पर्धेत मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दादर मुंबई येथे राहणाऱ्या
, जिल्हा सिंधुदुर्ग मधील सांगलवाडी या गावांतील , तालुका वैभववाडी मधील
श्री अविनाश पाटील व श्रीमती
अनुजा पाटील यांच्या कन्या मिस इंडिया, अंकिता पाटील यांनी केले. त्या स्पर्धेत
1st Runner up म्हणून जिंकून आल्या आहेत. त्या व्यतिरिक्त Best Smile, Best
Catwalk हे 'किताब सुद्धा मिळाले आहेत. अंकिता पाटील यांना सदर स्पर्धेकरिता मिस.पूजा
बीमरा, माजी मिस इंडिया व इंटरनॅशनल
pageant coach, यांनी प्रशिक्षण दिले व तयारी करून घेतली.
अंकिता पाटील हिचे वडील
श्री अविनाश पाटील हे मुंबई पोलीस दलात, विलेपार्ले पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस
उप निरीक्षक पदावर कार्यरत आहेत तर आई अनुजा पाटील ह्या बृहन्मुंबई महानगर पालिकेत
परिचारिका (नर्स) म्हणून कार्यरत आहेत.अंकिता पाटील यांनी मध्यमवर्गीय कुटुंबातून येऊन,
आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशातील प्रतिभावान मुलीसोबत स्पर्धेत उतरणे हा प्रवास
नक्कीच सोपा नव्हता से तिचे म्हणणे आहे, अतिशय अडथळ्यातून, कष्टाने व मेहनतीने मिळवलेले
यश आहे. सध्या ती नृत्य, मॉडेलिंग,अभिनय करीत असून तिला त्याची आवड आहे. चित्रपट सुष्ट्रीत
पदार्पण करणार आहे.असे तिने आपल्या मुलाखती मध्ये सांगितले आहे.
Post a comment