web-ads-yml-750x100

Breaking News

हज यात्रेसाठी 10 हजार 408 यात्रेकरुंची संगणकीय सोडतीद्वारे निवड

BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
सन 2020 च्या हज यात्रेसाठीची संगणकीय सोडत (लॉटरी) जाहीर झाली असून या सोडतीत राज्यातील 10 हजार 408 जणांची हज यात्रेसाठी निवड झाली आहे. केंद्रीय हज समितीच्या हॉलमध्ये अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते आज या सोडतीचा कार्यक्रम संपन्न झाला.हज 2020 करिता राज्यातून एकूण 28 हजार 712 इतक्या हज यात्रेकरूंनी अर्ज दाखल केले आहेत. राज्याला एकूण 12 हजार 349 इतका प्राथमिक कोटा प्राप्त झाला आहे. यामध्ये 70 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1 हजार 910 ज्येष्ठ इच्छुक यात्रेकरुंनी अर्ज केले आहेत. महिला राखीव प्रवर्ग (मेहरम शिवाय जाणाऱ्या स्त्रिया) 31 आहेत व खुला प्रवर्ग 10 हजार 408 असा आहे. राखीव प्रवर्ग संख्या 1 हजार 941 जागा वगळता उर्वरित एकूण 10 हजार 408 हज यात्रेकरुंकरिता आज संगणकीय सोडत (लॉटरी) काढण्यात आली.

No comments