0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून थेट पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहले आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वत: लक्ष घालून संबंधीतांना यासंबंधी निर्देश द्यावेत असं उद्धव ठाकरे यांनी मोदी यांनी लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.पत्रात लिहलय, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे १६ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करुनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे.बऱ्याच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असेही उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे.


Post a comment

 
Top