0
BY - प्रणव भांबुरे,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
पोलिसांचे कौंटुबिक जीवन तणावमुक्त करण्यासाठी घरकूल संकल्पनेतून कल्याणमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमास पोलिस व त्यांच्या कुटुंबियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी पोलिसांच सर्व कुटुंब उपस्थित होत. के. सी. गांधी शाळेत आयोजित या उपक्रमास अतिरिक्त पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्यासह पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. पोलिसांना 12 तासापेक्षा जास्त काम करावे लागते तर काही प्रसंगी 24 तास काम असू शकते.
त्यांना कुटुंबासाठी वेळ देता येत नाही. उत्सवांच्या दिवशी तर कडक बंदोबस्त असतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांशी त्यांचे खटके उडतात. विसंवाद होतो. पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तिने तसेच त्यांच्या पत्नीने पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्या कर्तव्याला कशा प्रकारे समजून घेतले पाहिजे तसेच त्यांच्याशी कसे वर्तन केले पाहिजे. त्यांच्या अपेक्षा व जबाबदाऱ्या काय असतात. हे समजून घेण्यासाठी आणि पोलिस कुटुंबियांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी हा घरकूल उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाची संकल्पना अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी मांडली होती. नाशिकच्या गोबी व्यक्तिमत्व विकास अकादमीचे व्याख्याते गोपी गिलबिले आणि त्यांच्या पत्नी अनिता गिलबिले यांनी उपस्थित पोलिस कुटुंबियांना मार्गदर्शन केले. तणावमुक्त व सुसंवादी जीवन कसे जगावे याच्या काही महत्वपूर्ण टिप्स यावेळी देण्यात आल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस आयुक्त कराळे यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या पत्नीकडून उपक्रमाविषयी समाधान व्यक्त करण्यात आले

Post a comment

 
Top