0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश साळगांवकर यांच्या  ७५ व्या वाढदिवसा निमित्ताने छोटेखानी सत्कार सोहळा मुंबईतील शिवाजी मंदिर , दादर येथे प्रसिद्ध कलावंतांच्या उपस्थितीत संपन्न झाला याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेते हरिश्चंद्र भंडारे (हरी काका), अभिनेता सुरेश डाळे-पाटील, दिग्दर्शक -पत्रकार महेश्वर तेटांबे, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार, दिग्दर्शक संजीव नाईक ,  निर्मिती व्यवस्थापक गणेश तळेकर , शिरीष राणे, राजू मोरे , सचिन गायकवाड , कॅमेरामन बिपिन मोरे , पंकज गांगण आदी दिग्दर्शक -निर्माता -तंत्रज्ञ मान्यवर उपस्थित होते. मराठी सिनेसृष्टी मध्ये अनेक दिग्गज कलावंत , नामवंत दिग्दर्शक होऊन गेले प्रत्येकानी आपापल्या परीने या सिने सृष्टी मध्ये जम बसविला देखील पण त्यातूनही काही प्रतिभाशाली दिग्दर्शक असे आहेत की ते प्रसिद्धी माध्यमांपासून दूर आहेत त्यातलेच एक म्हणजे आमचे सर्वांचे लाडके , मनमिळाऊ , चाणाक्ष बुद्धीचे दिग्दर्शक रमेश साळगांवकर.टेक्सटाइल डिझायनर म्हणुन कार्यरत राहून आवड जोपासता यावी म्हणुन सुरवातीला शाळा कॉलेज मधुन नाटकांमध्ये अभिनय. दर्जेदार नाटकं पाहता यावी म्हणुन दादर च्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात डॊअर कीपर ची नोकरी पत्करली. पण मनातील चंचलता -  दिग्दर्शकीय नजर स्वस्थ बसवेना तेव्हा मग हळूहळू ज्येष्ठ दिग्दर्शक व नाटककार कमलाकर तोरणे , राजदत्त , दत्ता केशव , ए.समशेर यांना गुरुस्थानी मानून त्यांच्या सोबत प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक म्हणुन ज्योतीबाचा नवस , बाळा गाऊ कशी अंगाई , भैरू पैलवान की जय , नेताजी पालकर , फटाकडी , मोसंबी नारंगी , ओवाळीते भाऊराया , जिद्द , आई मी कुठे जाऊ असे एकाहून एक सरस मराठी चित्रपट तर अलबेला (मेहमूद अभिनीत) ,यह देश , प्यारी बहेना , सदा सुहागन , दिल तेरा दिवाना , नाचे मयुरी इत्यादी हिंदी चित्रपट सुद्धा केले . त्यांचा प्रवास इथवर न थांबता त्यांनी आपल्या प्रतिभाशाली आणि तल्लख बुद्धीने स्वतः दिग्दर्शित केलेले माळावरचं फुल , सत्वपरिक्षा , मामला पोरींचा , मधुचंद्राची रात्र , चार दिवस सासूचे , दैवाचा खेळ , माझं काय चुकलं , परीस असे काही निवडक मराठी चित्रपट जे त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर घेऊन गेले. त्यात त्यांच्या सत्वपरिक्षा या मराठी चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट ग्रामीण चित्रपट दिग्दर्शक ,  निर्माता म्हणुन प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. ७५ वर्षे वयामध्ये सुद्धा काम करण्याची उमेद असलेल्या साळगांवकर यांनी सतत ४ वर्षे महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात परीक्षक म्हणुन तर गोवा कला अकादमी तर्फे मराठी  आणि कोकणी चित्रपटाला २ वेळा परीक्षक राहून  आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मराठी चित्रपट सृष्टी ला त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ तर्फे त्यांना २०१८ चा चित्रकर्मी पुरस्कार प्रदान करण्यांत आला. आज साळगांवकर वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा तितक्याच जोमाने , तितक्याच जोशाने "भेट" या नवीन मराठी चित्रपटाची संकल्पना तयार करत आहेत , पटकथा - संवाद लेखन करत आहेत .अशा या चतुरस्र , चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीच्या दिग्दर्शकाला त्यांच्या जन्मदिवशी लाख लाख शुभेच्छा..! 

Post a comment

 
Top