0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अमरावती  |
अमरावती जिल्ह्यातील 28 सिंचन प्रकल्पातील विविध निविदांची चौकशी सुरू होती. आता या चौकशीच्या फेऱ्यात अजित पवार दोषी नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष तपास पथकाचे ( एसआयटी) चे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडून उच्च न्यायालायाच्या नागपूर खडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. सिंचन घोटाळयात अजित पवारांना दोषी धरता येणार नसून ही चुकी अधिकाऱ्यांची असल्याचे उच्च न्यायालयाच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. शुक्रवारीच नागपूर एसीबीने अजित पवारांना पूर्णपणे क्लिनचिट दिलेली आहे.

Post a comment

 
Top