web-ads-yml-728x90

Breaking News

दुय्यम निबंधकांनी दिलेल्या आदेशाला मुद्रांक विक्रेत्यांनी मारले धाब्यावर ; परिस्थिती कायमच… प्रशासनाची भय राहिलीच नाही

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
काळयाबाजारात विक्री करणे व व्यावसायीकांना स्टॅम्पपेपर वेळेवर मिळत असून शेतकरी,विद्दयार्थ्यांना स्टॅम्पपेपर मिळत नाही तक्रारदारांनी पुणे ,ठाणे मुरबाड यांचेकडे तक्रार दाखल केली असता मुरबाड दुय्यम निबंधक अथिकारी यांनी आलेल्या बातमीची दखल घेत अहवाल सादर करण्यास लेखी आदेश परवाना धारक मुद्राक विक्रेत्यांना दिला असता त्या आदेशाला मुद्रांक विक्रेत्यांनी धाब्यावर मारले आहे.जी परिस्थीती आहे ती कायम राहिली असून त्या तक्रारीचे निरासरण न होता अद्दयाप तो प्रस्ताव दुय्यम निबंधक अधिकारी मुरबाड यांनी धुळखात ठेवला आहे.विशेषतः तक्रारीवर कधी सुनावणी एैकली नसेल अशी घटना मुरबाड येथिल दुय्यम अधिकारी मुरबाड यांनी केली.त्यांनी तक्रारीवर सुनावणी लावून मुद्रांक विक्रेत्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे संकेत दिसून येत आहे असेच म्हणावे लागेल.याचा फायदा मात्र मुद्रांक विक्रेत्यांना होत असून ज्या ठिकाणी परवानगी त्याच ठिकाणी राहण्याची मागणी केली होती परंतु तक्रारदारांना दुय्यम निबंधक अधिकारी यांनी सुनावणीचे पत्र देऊन त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला आहे.आजतागायत सदरची गंभीर बाब तशीच असून न्यायाच्या प्रतिक्षेत मात्र अर्जदार आहे.बेकायदेशीर स्टॅम्पविक्रेत्यांनी तहिेसलदार कार्यालयाबाहेर आपला धंदा मांडला असून 100 रूपयाच्या स्टॅम्पची 300 रूपयावर विक्री करून नागरिकांची लूट करीत आहेत.परवाना धारकांबरोबर दुय्यम निबंधक अधिकारी बेकायदेशीर विकणार्‍याला वाचविण्याचा प्रताप करत असल्याचे कारवार्इ न करण्यातून दिसून येत आहे.यामध्ये प्रशासनाची भय राहिली नसून बेशूमार बेकायदेशीर प्रकार चालू आहे.डोळयासमोर घडणार्‍या घटनेवर पडदा टाकण्याचे काम अधिकारी वर्ग करित असेल तर न्यायाची अपेक्षा कोनाकडे करणार असा सवाल तक्रारदारांनी केला आहे.


No comments