0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
ड्रेनेज लाईनचं काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडून खड्ड्यात गाडल्या गेलेल्या मजुराचा मृत्यू झाला, तर बचावकार्यादरम्यान अग्निशमन दलाच्या जवानालाही प्राण गमवावे लागले. पुण्यात पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी भागात हा दुर्दैवी प्रकार घडला.
ड्रेनेज लाईनचं काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने तीन मजूर पंधरा ते वीस फूट खोल खड्डयात अडकले होते. त्यापैकी दोघा मजुरांना बाहेर काढण्यात आलं. मात्र 22 वर्षीय नागराज जमादार या मजुराचा मृत्यू झाला. तर पिंपरी चिंचवड महापालिकेतील विशाल जाधव या अग्निशमन दलाच्या जवानालाही बचावकार्यादरम्यान प्राण गमवावे लागले. निखिल गोगावले, सरोज पुंड हे जवान आणि ईश्वर बडगे, सीताराम सुरवसे हे मजूर जखमी आहेत.

Post a Comment

 
Top