0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – यवतमाळ | 

क्रिकेट सामना खेळून वर्धा येथे परतणाऱ्या क्रिकेटपटूंच्या गाडीला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना नागपूर-तुळजापूर महामार्गावर घडली आहे. या अपघातात दोन क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जयेश प्रविण लोहिया (वय 10) आणि अक्षद अभिषेक बैद (वय 11), अशी मृतांची नावे आहेत. हे खेळाडू वर्ध्याच्या 'ब्रदरहूड' क्रिकेट क्लबचे होते.

Post a comment

 
Top