0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
आरोग्य सेवेच्या विविध तक्रारी होत असतांना त्यावर चौकशी केली जात नसून माहिती अधिकारी अंतर्गत माहिती दिली जात नसल्याने ठाणे आरोग्य सिव्हील हॉस्पीटल हे मुख्य आरोग्य सेवेचे केंद्र असून मोठया प्रमाणात उलाढाल केली जाते असेच निष्कर्ष समोर येतात.ठाणे आरोग्य सिव्हील हॉस्पीटल यांच्याकडे काही महिण्यापुर्वी मुरबाड ग्रामीण रूग्णालयातील प्रयोग शाळा सहाय्यक विभागातील हिराकांत दामू फर्डे यांनी त्यांच्या मुलीच्या ऑपरेशन करिता मेडिकल क्लेम प्रस्ताव टाकला होता त्या प्रस्तावाला मंजूरी दिली परंतू उपसंचालक विभाग अधिकारी हे फर्डे यांना फिरवले जात असल्याने आपल्या मुलीच्या जिवासाठी अखेर एका शासकीय कर्मचार्‍यानीच खाजगी कर्जाचा सहारा घेतला.
परंतू त्या अधिकार्‍याला दया आली नाही.आजतागायत एक वर्षाच्या आसपास होत आले तरी अद्दयापही हा विषय संबंधित कर्मचारी,अधिकारी यांनी धुळखात ठेवला आहे.प्रियंका हिराकांत फर्डे हिचा ऑपरेशन झाला तरी तिच्या ऑपरेशन करिता मडिकल बिल अजूनही फिर आहे परंतू यातून हिराकांत दामू फर्डे वय वर्षे 58 हे आपल्या येणार्‍या पगारतूनच कर्ज फेडण्याचा आणि कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.हिराकांत फर्डे यांनी 63 हजाराचा मेडिकल क्लेम केला असता वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे आज एक कर्मचारी कर्ज फेडत आहे ही खेदजनक बाब आहे.ज्यांनी आपले अर्धेपेक्षा जास्त आयुष्य प्रयोग शाळा सहाय्यक म्हणून जनसामान्यांची सेवा केली त्या कर्मचार्‍याला शासकीय मदत मिळाली नाही याचे दुखः हिराकांत फर्डे यांच्यासह त्यांच्या कुटूंबाला कायम राहिल अशा कुटूंबाच्या मनात एक दुखची खंत बनविणार्‍या अधिकार्‍यांनी त्यांची मेडिकल बिलाची फार्इल मात्र कपाटात डांबली आहे.मेडिकल बिलाची मदत द्दयायची नसेल तरी चालेल परंतू फार्इलीबरोबर मला फिरवू नका भले माझ्या बिलाला तुटी काढून रिजेक्ट असेही त्यांनी म्हंटले.अशा अन्यायाची बाब आता आरोग्य कर्मचार्‍यांच्या विभागात पहायाला मिळत असल्याने सामाजिक संघटना आरोग्य विभाग ठाणे यांचे विरोधात जाऊन हिराकांत दामू फर्डे यांना शासकीय परिपत्रकानुसार मेडिकल क्लेम मिळवून देर्इल तसे न झाल्यास आंदोलन,मोर्चे काढू असा इशारा मुरबाड विकासमंच ट्रस्ट,सामाजिक संघटनांनी दिला आहे.

Post a Comment

 
Top