0
BY - दादा सावंत,युवा महाराष्ट्र लाइव – उल्हासनगर |
असंघटित कष्टकरी कामगार संघटना गेल्या काही वर्षांपासून घरकाम, बांधकाम कामगार / नाकाकामगारांच्या हक्क अधिकारावर काम करत आहे.महाराष्ट्र सरकाने बनलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ आणि कायद्याची जनजागृती करत आहे, संघटनेच्या वतीने शासनाकडे अशी मागणी करत आहोत कीं घरकामकामगार महिलांना सन्मानजनक काम,कामाचा योग्य मोबदला भरपगारी आठवड्याची रजा वर्षातून एकदा पगारवाढ अशा विविध मागण्यांसाठी काम करत आहे.संघटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर,अंबरनाथ,कल्याण या महानगरपालिका क्षेत्रात  संघटनात्मक काम करत आहे.
शेकडी महिलांना ओळखपत्र वाटप
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैशाली कांबळे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीरा सपकाळे यांनी केले,संघटनेचे अध्यक्ष सुनील अहिरे,प्रमुख व्यक्ती रुपेश ससाणे यांच्यासह प्रज्ञा बागुल,मंदा मस्के,अलका ब्राम्हणे हीरा बिरर,निर्मला बोराडे,अरुणा सोनवणे,शालिनी बिररे उज्वला जावरे,संध्या केदार,अल्का बर्म्णे,सुलोचना पवार यांची उपस्थीती होती,

Post a Comment

 
Top