0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – औरंगाबाद |
औरंगाबाद-जालना महामार्गावर एक भीषण अपघात घडला या अपघातात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुर्दैवी बाब म्हणजे मृत्यू झालेल्या सहा जणांपैकी पाच जण हे एकाच कुटुंबातील आहेत. शिवाय, या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी (25 डिसेंबर) बदनापूरपासून 8 किमी अंतरावर घडला अपघातातील चारही जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
औरंगाबादकडून जालन्याकडे विरुद्ध दिशेने जात असलेल्या भरधाव टोयोटा कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने समोरुन येत असलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, रिक्षा आणि रिक्षात बसलेले लोक काही फुटापर्यंत हवेत उडाले. यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आणि कारचंही मोठं नुकसान झालं. या अपघातात रिक्षात बसलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका सहा महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. सर्वच मृतक हे जालन्यातील रहिवासी आहेत. एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a comment

 
Top