0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
शहरातील नागरिकांना मालमत्ता कर सुलभ तसेच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून भरता यावा याकरिता ठाणे महापालिकेने विकसित केलेल्या मालमत्ता कर या अॅप्लिकेशनला 7 व्या बिसनेसवर्ल्ड स्मार्ट सिटीस ऍण्ड अवॉर्ड समारंभात ''स्मार्ट सोल्युशन ऑफ द ईअर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ रोजी अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअर येथील सभारंभात ठाणे महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावतीने उप कर निर्धारक व संकलक जी.जी. गोदेपुरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.  महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने मालमत्ता कर संकलनात उत्कृष्ट कामगिरी केली. नागरिकांना मालमत्ता कर सुलभ तसेच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून भरता यावा याकरिता हे अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.

स्मार्ट सिटीमध्ये भरीव योगदान केलेल्या संस्थांकडून  ७ व्या  बिसनेसवर्ल्ड स्मार्ट सिटीस ऍण्ड अवॉर्डकरिता नामनिर्देशन मागविण्यात आली होती. यामध्ये ठाणे महानगरपालिकेने मालमत्ता करासाठी विकसित केलेल्या नॉन डिस्क्रेशनरी प्रॉपर्टी टॅक्स अॅप्लिकेशनचे नामनिर्देशन सादर  करण्यात आले. यामध्ये या अॅप्लिकेशनचे विशेष परीक्षकांकडून परीक्षण करून 'स्मार्ट सोल्युशन ऑफ द ईअर' विभागात विजयी घोषित करण्यात आले.

Post a Comment

 
Top