0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
आजच्या जडण घडणीत वाढते शिक्षण व्यवसाय आणि प्रतिष्ठा यामध्ये अनेक मुलामलींचे शुभ विवाह,लग्ने लवकर होत नाहीत,समाज परंपरेनुसार यापुर्वी 18 ते 20 वर्षात लग्न होत मात्र आज शहरीकरण तसेच ग्रामीण भागातील दरी कमी होताना यावर्षी पुढिल वर्षी अशा वेळकाढूपणात जेव्हा लग्नाची लगबग सुरू होते तेव्हा मुलामुलीचे लग्न ठरवलेल्या कालावधीत जमत नाहीत त्यावर एक समाजाचा योग्य दाता म्हणून कुणबी समाजाचे नेते भास्कर टेंभे,पंढरीनाथ आगिवले यांच्या समर्थकांनी ताडआळी शेजारील आगिवले बिल्डींगमध्ये कुणबी,आगरी,मराठा तसेच सर्व समाजातील श्रीमंगल वधु-वर सुचक केंद्र सुरू केले आहे.
          मुरबाड,शहापूर,कर्जत,कल्याण,भिवंडी,उल्हासनगर,बदलापूर,अंबरनाथ अन्य परिसरातील मुलां मुलीचे विवाह नोंदणी या मुरबाड व गोवेली केंद्रात केली जात असून लग्न जमवली जातात.अनेकांनी या वधु-वर सुचक केंद्रात नोंदणी केली आहे.चांगल्या विचाराची समाजसेवा जोपासण्याचे काम भास्कर टेंभे,पंढरीनाथ आगिवले त्यांच्या सहकार्‍यांनी सुरू केली आहे.त्यांना समाज दानशूरांनी पुढे येऊन मदत करणे गरजेचे आहे.
            मुलांमुलींचा बायोडेटा,जन्मपत्रिका(कुंडली),पासपोर्ट सार्इज फोटो घेऊन आल्यावर लग्न जमवण्यास सोयीस्कर होतंच.मुरबाड सारख्या ठिकाणी वधु-वर सुचक केंद्राची गरज होती,समाजाची सेवा अशा कार्यातून घडते यातून सिध्द होते.समाजाचे नेतृत्वाने समाजासाठी काय करावं,समाजाला आपण काय देतो अशी समाजाची जडण-घडण अडचणी या वधु-वर केंद्रतून पाहण्यास मिळत आहे.Post a comment

 
Top