0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड शहरात मल्टिस्पेशालिस्ट नावाखाली खरे खोटे,डॉक्टरांची हॉस्पीटले सुरू आहेत 5यांच्या चौकशीची मागणी अनेक वेळा करून देखलि शासनाने कारवार्इ केली नाही त्याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
            हृदयविकार,डेंग्यू,टायफार्इड,मुतखडा,अल्सर,साप,विचूं,विषप्राशन,अपघात,कंपनीत कामगारांचे होणारे अपगात यांसह सर्वच आजारावर तज्ञ नसलेले डॉक्टर उपचार करतात त्यातून एखाद्दया रूग्णांचा मृत्यु झाला,कंपनीत अपघात झाला,विष प्राशन,डेंग्यू,टायफार्इड,अपघात,आत्महत्या प्रयत्न अशा रूग्णांची माहिती पोलिस ठाणे,शासकीय आरोग्य अधिकारी यांचेकडै नोंदी होत नाहीत त्यामुळे दिवसेंदिवस वाढलेले आजार,गुन्हेगारी कंपनी मालकीची दबंगगिरी वाढत चालली आहे.विंचू,साप,कामगार अन्य रूग्णांचा मृत्यु झाल्यास त्यांना शासनाकडून तसेच खजगी कारखानदाराकडून मिळणारी अनुदान इन्शुरन्स मदत मिळत नाही.
            ही मल्टिस्पेशालिस्ट रूग्णालय अनधिकृत इमारतीत सुरू आहेत.काही भरवस्तीच्या रस्त्यावर आहेत या रूग्णालयात रूग्णांवर उपचार करण्यासाठी एम.डी,सर्जन,फिजीसिएशन डॉक्टर नाहीत,कर्मचारी आरोग्य शिक्षण घेतलेले नाहीत,रूग्णांना हजारो रूपयांची औषधे आपल्याच मेडिकल मधून दिली जातात,रूग्णांकडून डॉक्टर नर्स,कामगार खाट यांसह रात्रंदिवसाचं प्रचंड भाडं घेतलं जातं.त्याचा सामान्य रूग्णांना कर्जबाजारी होऊन उपचाराला बळी पडावे लागत आहे.

            या हॉस्पीटलच्या इमारती एन.ए नाहीत,त्यांना परवानग्या कोणत्या आधारे दिली जातात याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे.एका हात्स्पीटलच्यावर भरवस्तीत अवैधरित्या टेलिफोन टॉवर बसविण्यात आल्याने त्याचा सर्वात मोठा फटका व जास्तीत जास्त परिणाम हा रूग्णालयातील रूग्णांवर तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची भिती व्यक्त होत आहे.आणि या टॉवर खाली रक्तटेस्ट,प्रयोगशाळा अन्य आय.सी.यू खाली रूग्णांची लायब्रट्री सुरू आहे.

Post a Comment

 
Top