0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
भिवंडी तालुक्यातील भादाणे ग्रामपंचायत हद्दीत जुपाडा रस्त्यालगत असलेले पॅराडार्इज रेस्टॉरेंन्ट व कॅफे यांच्या विविध परवानग्याची चौकशी करून सदरचे बेकायदेशिर सुरू असलेले हॉटेल ग्रामस्थांना त्रास दायक ठरत आहे.त्यावर बंदी घालावी अशी लेखी मांगणी भारिप बहुजन महासंघाचे भिवंडी तालुका अध्यक्ष योगेश मोतीराम कथोरे यांनी भिवंडी उपविभागीय अधिकार्‍यांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.भादाणे ग्रामपंचायत हद्दीतील जुपाडा बुडीत श्रेत्रालगत सदरचे हॉटेल असुन त्यामध्ये मद्यापी धिंगाणा,नाचगाणे अन्य प्रकार चालतात.एक रिसॉर्ट म्हणुन या ठिकाणी शाळेचे विद्यार्थी यांच्या सहलीसह मद्यापी पर्यटक वास्तव्य करतात.
हॉटेलकडे जाण्यासाठी भादाणे गावातुन अरूंद रस्ता असल्याने वाहतुक अडचणी, अपघात घडतात.अशा पॅराडार्इज हॉटेलला वनविभाग,महसुल,पोलिस,ग्रामपंचायत,सिंचनविभाग यांनी परवाना कसा व कोणत्या आधारे दिला.हॉटेल मधील स्विमींग पुलासाठी होणारा पाण्याचा वापर,विजपुरवठा अशा सर्व गोष्टीची चौकशी करून पॅराडार्इज हॉटेल व कॅफे यावर बंदी घालावी अन्यथा ग्रामस्थांच्या आग्रहस्थ भारिप बहुजन महासंघ जनआंदोलन छेडेल असा इशारा योगेश कथोरे यांनी दिला आहे.भिवंडी तालुक्यात अनेक रिसॉर्ट फार्महाऊस मध्ये रेनडांन्स,मौजमस्ती अनेक प्रकार चालतात,त्यांना एम.टी.डी.सी.चे परवानगी दिली आहे काय? याचीही चौकशी झाल्यास अवैध हॉटेल,कॅफे,रिसॉर्ट यांना आळा बसेल.Post a comment

 
Top