0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे |
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray CAA) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यावर भाष्य केलं. निवडणुका झाल्यापासून मी काही बोललो नव्हतो. माझीच नव्हे तर सर्व महाराष्ट्राची वाचा खुंटली होती जे काही सुरू होत त्यावरुन. येत्या 23 जानेवारीला मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईत होईल. निवडणुकीत काय काय झालं यावरच माझं मत मी अधिवेशनात मांडेन, असं राज ठाकरे म्हणाले. 
एनआरसी आणि कॅब या विषयाला वेगवेगळे कंगोरे आहेत. आज देशात जे मोर्चे निघत आहे, दंगेसदृश स्थिती आहे, जाळपोळ होत आहे, यातील किती जणांना हे माहिती आहे याबद्दल शंका आहे. या कायद्याबद्दल अमित शाह यांचं मी अभिनंदन करतो. त्यांनी खूप हुशारीने आर्थिक मंदीवरील लक्ष हटवत याकडे गुंतवून ठेवलं. जर आधार कार्ड आणि मतदान कार्डावर मतदान करता येतं, तर मग नागरिकत्व सिद्ध का करता येत नाही?, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.

Post a comment

 
Top