0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – पंढरपूर |
नववर्षाच्या सुरुवातीपासून (1 जाने. 2020 )पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात मोबाईल नेण्यास मनाई करण्याचा ठराव मंदिर समितीच्या बैठकीत करण्यात आला. याचबरोबर मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांना लाऊड स्पिकरला ही आता परवानगी मिळणार नाही. समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यात मंदिरात साठलेली 55 लाख रूपयांची नाणी रक्कम एचडीएफसी बँकेत ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. ही नाणी स्वीकारण्यास अन्य बँका तयार नाहीत.
आळंदीला जाताना संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याला 19 नोव्हेंबरला दिवे घाटात अपघात होवून सोपान महाराज नामदास व अतुल आळशी यांचे निधन झाले होते. मंदिर समितीच्या वतीने त्यांच्या कुटूंबाला प्रत्येकी अडीच लाख रूपयाची मदत जाहीर करण्यात आली आहे. या बैठकीत सन 2018-19 च्या लेखापरीक्षण अहवालास मंजुरी देण्यात आली. 32 सुरक्षा रक्षक आऊटसोअर्स करून नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Post a comment

 
Top