0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज मंगळवारपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. राज्यात आता शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार सत्तेत आल्यानंतर हे नागपुरातील पहिले हिवाळी अधिवेशन आहे. याच कारणांमुळे वैदर्भीय जनतेच्या न्याय्य मागण्यांबाबत सरकारला मार्गदर्शन करणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष संघटनेचा पूर्व आणि पश्चिम विदर्भात विस्तार करण्यासाठी दोन दिवस पवारांचा मुक्काम नागपुरात असणार आहे.
बारामती आणि पुणे जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपून आज, मंगळवारी सायंकाळी शरद पवार नागपुरमध्ये दाखल होतील. ते संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक घेणार आहेत. यावेळी ते त्यांना मार्गदर्शन करतील. हिवाळी अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्र्यांच्या नावावर ते शिक्कामोर्तब करू शकतात अशाही चर्चा सुरू आहेत. 

Post a comment

 
Top