0
BY - केदार नार्इक ,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण  |
12 ते 15 वर्षा अगोदर शालेय विद्दयार्थ्यांची रिक्षातून वाहतूक होऊ नये म्हणून सांगण्यात आले नंतर याविषयावर रिक्षा चालक मालक संघटनेनी कोर्ताचा दार ठोठावला होता तेव्हा 5 ते 6 शालेय विद्दयार्थी रिक्षावाले रिक्षात बसवून वाहतूक करू शकतात असा निर्णय दिला होता परंतू अलीकडे पुन्हा याच विषयाला उभारून पुन्हा बंदी घातली आहे.
याविषयी आज रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहरच्या वतीने बैठक घेण्यात आली.यामध्ये रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहरचे अध्यक्ष प्रकाश पेेणकर(नाना) यांच्यासह सर्व रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.गल्लीमध्ये बस पोहोचू शकत नाही परंतू रिक्षा शालेय विद्दयार्थ्यांना घरपोच दारासमोर सोडू शकते याची दक्षता आम्हाला आहे.परंतू बस तेथे जाणे शक्य नाही म्हणून या बैठकीत पुन्हा हायकोर्टात जाऊन अपिलाच्या मागणीने रिक्षा टॅक्सीतून शालेय विद्दयार्थ्यांना नेण्याच्या परवानगीची विनंती करणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहरचे अध्यक्ष प्रकाश पेणकर (नाना) यांनी मांडलेल्या विचाराला सर्व सदस्यांनी हिरवा कंदील दिला.अन्याय नाही पण न्याय हा मिळाला पाहिजे कारण उदारनिर्वाहापेक्षा शालेय विद्दयार्थ्यांची जबाबदारी जास्त महत्वाची असून रिक्षा व टॅक्सीद्वारे अतिसुरक्षा मिळत असून घरामध्ये विद्दयार्थी हा पाहोचतो म्हणून या गंभीर विषयाला पाहता हि मिटींग घेण्यात आली व कोर्टाचा दार ठोठावणार असल्याचे यावेळी अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी बोलतांना सांगितले.


Post a comment

 
Top