0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुबई |
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण तर राज्यभिषेकच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून सूत्रसंचालन मा.महेश आंबवले यांनी मान्यवरांच्या स्वागताने केली, कार्यक्रमाची प्रस्तावना मा वैभव घाडगे सहसचिव स्वराज्य प्रतिष्ठाण यांनी केली प्रस्तावने मध्ये स्वराज्य प्रतिष्ठाण या चळवळीची मूळ भूमिका व विद्यार्थ्याचे गुणगौरव करण्या मागचा प्रांजळ हेतू उपस्थित बांधवान समोर व्यक्त केला.
  मा विकास लांबोरे सर यांनी मुख्य परीक्षा लोकसेवा आयोग व राज्यसेवा आयोग परीक्षेचे मौलिंक असे मार्गदर्शन केले. व स्वराज्य प्रतिष्ठाण चळवळ योग्य कार्य करत आहे असे अनेक मुद्द्यावर प्रकाश टाकला,
मा.अनिल झोरे सर यांनी मार्गदर्शन करत असतांना इंजिनिअरिंग या क्षेत्रातले स्वताचे आपले अनुभव व्यक्त केले व विद्यार्थ्यांनी चिकाटीने अभ्यास या विषयाकडे लक्ष देऊन मनगटात असलेल्या शक्तीवर पुढे आले पाहिजे, विद्याथी कितीही गरीब परिस्थितीतून आला असला तरीही त्याच्या परस्थिती सोबत त्याच्या त्यागाला अधिक महत्व दिल पाहिजे विद्यार्थ्यांणी स्वतःच्या इच्छेने निर्णय घेण्या अगोदर अनेक मागर्दशन करणाऱ्या व्यक्तींकडून मार्गदर्शन घेऊन आपले स्वताचे निर्णय घेतले पाहिजेत.
PSI मा.ज्ञानेश येडगे सर यांनी ऋणानुबंध संस्था कोणत्या पद्धतीने वाटचाल करत आहे या संबंधी मार्गदर्शन करत पुढे म्हणाले की, मी स्वता PSI अनेक श्रमातून झालो आहे मी ज्या वेळी ज्या कामाला महत्व दिल ते केवळ शिक्षणच होत, कोकणातील केवळ 6 IPS आहेत व कोकणात प्रचंड उशार विद्वान कुशल विद्यार्थी आहेत परंतु योग्य मार्गदर्शन नसल्या मुले आपले विद्यार्थी 12 वि ग्रॅज्युएशन नंतर स्पर्धा परीक्षेत किंव्हा सरळ सेवा परीक्षेत दिसत नाही याचं कारण म्हणजे योग्य मार्गदर्शन नसणे, ज्यांना योग्य निर्णय घेयाचा असतो त्यांनी यशस्वी बांधवांचे inspiration (आदर्श) घेतले पाहिजे.
मा.सुभाष कोलापटे सर यांनी ITI या क्षेत्रातील सखोल अशी माहिती आपल्या व्यक्तव्यातून व्यक्त केली, ITI मधील विद्यार्थी जर मोठ्या मेहनतीने चांगले गुण मिळवले तर तो विद्यार्थी विदेशात जाऊन नोकरी करू शकतो, म्हणून  ITI या क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी प्रचंड, परिश्रम, मेहनत घेऊन चांगल्या गुणाने पास झाले पाहिजे व  उच्च पदावर आपल्या क्षेत्रात विराजमान झाले पाहिजे.
कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऋणानुबंध संचालक प्रमुख मार्गदर्शक मा.विकास लांबोरे सर, PSI सब इंस्पेक्टर ज्ञानेस येडगे सर, इंजिनिअरिंग प्रशिक्षित मार्गदर्शक मा.अनिल झोरे सर, आयटीआय प्रशिक्षक मा.सुभाष कोलपटे सर तसेच मान्यवर कुणबी समाजोन्नती संघ उपाध्यक्ष मा.तुकाराम लाड सर, शाखा तळा अध्यक्ष मा. सुनिल कवणकर सर, वैद्यकीय विभाग मा. नितीनजी चाळके, जल फाऊंडेशन संस्था खेड संपर्क प्रमुख मा.सुदर्शन खेडेकर सर,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुलाबा उपाध्यक्ष मा.विठ्ठल सावंत सर, कुणबी युवा अध्यक्ष मा.माधव कांबळे सर, कुणबी युवा टीम मा.रमेश करंजे सर,मा युवराज संतोष सर, सचिन रामाने सर, मिलिंद चिबडे सर, मा.राजेश शिगवण सर, मा.मंगेश पिंगळे सर, मा. सुनील जाईलकर सर,  मा.मंगेश पवार सर, मा.नामदेव मोरे सर, मा.नारायण मोरे सर, मा.दीनानाथ अडखले सर,मा.विजय घाडगे सर, मा. राम चाळके सर, मा.प्रकाश कदम  सर अशी अनेकजण होते व मा माधव कांबळे अध्यक्ष कुणबी युवा मुबई यांनी विद्यार्थ्याना शुभेच्छा देत पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांणी एका वेळच्या जेवणासाठी मेहनत नकरता पिढयानिपिढ्यांचे अस्तिव निर्माण होईल असा निर्णय घेतला पाहिजे.
युवा प्रबोधनकार मा.रोशन पाटील यांनी शेवटी भाषण करतांना म्हटलं स्वराज्य प्रतिष्ठाण ही संघटना केवळ बोलतच नाही ते जे बोलते ते आचरणात कार्य यशस्वी रित्या करून दाखवते, रायगड जिल्ह्यातील सर्व जातींना सोबत घेऊन चाळणारी संघटना म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठाण आहे, ओबीसी जातीनिहाय जनगणना, रिफायनरी प्रकल्प या हानिकारक प्रकल्पाला विरोध करणारी पहिली संघटना स्वराज्य प्रतिष्ठाण आहे, विद्याथी युवकांना विचारमं निर्माण करून त्याच्या कलागुणांना वाव देऊन सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, या क्षेत्रात प्रामुख्याने लढणारी संघटना म्हणजे स्वराज्य प्रतिष्ठाण, पुढे ते म्हणतांना म्हणाले की, १९५० च्या आगोदर बहुजन समाजाला शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क न्हवत परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम २१ नुसार विद्यर्थ्यांना शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क दिला व तो हक्क आज आपण योग्य पद्धतीने अमलात आणून आपण शेयरिंग पॉवर चे प्रतिनिधी झालो पाहिजे..
प्रमुख मार्गदर्शन संपल्यानंतर आलेल्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थी / विद्यार्थीनी यांचा गुणगौरव सोहळा करण्यात आले आणि शेवटी संघटनेच्या महिला संघटक प्रमुख माधुरीताई कोंडके यांनी उपस्थित मान्यवर मंडळी, प्रमुख मार्गदर्शक, विद्यार्थी मित्र , पालकवर्ग आणि सर्व संघटनेच्या शिलेदारांचा आभार मांडून कार्यक्रमाची सांगता केली.

Post a comment

 
Top