0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
भारतीय छात्र संसद फाऊंडेशन , एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसांच्या भारतीय छात्र संसदेचे दि . २० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२० दरम्यान विज्ञान भवन , नवी दिल्ली येथे आयोजन केले आहे .
सन २०११ पासून दरवर्षी या छात्र संसदेचे आयोजन करण्यात येत असून भारत सरकारचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, तसेच  क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय आणि मानवाधिकार, लोकशाही , शांतता आणि सहिष्णुतासाठीचे युनेस्को अध्यासन यांच्या मदतीने ही छात्र संसद होत आहे . नॅशनल टीचर्स काँग्रेस फाउंडेशन , नॅशनल विमेन्स पार्लमेंट , सरपंच संसद , असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस ( टीआयएसएस ) यांच्या सहकार्याने ही संसद भरविण्यात येणार असून अनेक राष्ट्रीय संस्थांनीही या संसदेला पाठिंबा दिला आहे . दहाव्या छात्र संसदेचे उद्घाटन गुरुवार , दि. २० फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता होईल व समारोप रविवार , दि. २३ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १.०० वाजता होईल. भारत सरकारच्या युवक व कल्याण व क्रीडा राज्यमंत्री मा. श्री. किरेन रिजीजू हे या छात्र संसदेचे चीफ पॅट्रन आहेत.
चार दिवस चालणाऱ्या या छात्र संसदेत तेलगु अभिनेता, निर्माता, जनता सेना पार्टी व कॉमन मॅन प्रोटेक्शन फोर्सचे संस्थापक श्री. पवन कल्याण ( कोनिडेला कल्याण ), केंद्रीय वस्त्रोद्योग, महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती झुबिन इराणी, माजी केंद्रीय राज्यमंत्री व लोकसभेचे माजी खासदार श्री . ज्योतिरादित्य सिंधिया, प्रख्यात पत्रकार, लेखक व थेरेपीचे मुख्य संपादक श्री. शेखर गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कंट्री फर्स्ट फाउंडेशनचे संस्थापक श्री. शिव खेरा, भारतीय कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी ) च्या पॉलिट ब्युरोचे सदस्य व ज्येष्ठ नेते श्री. प्रकाश करात, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे माजी राज्यमंत्री व युवाकार्य व क्रीडा राज्यमंत्री श्री. जितेंद्र सिंह, केंद्रीय वित्त व कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री श्री. अनुरागसिंग ठाकूर, केंद्रीय संसदीय कार्यमंत्री श्री. प्रल्हाद जोशी, भारतीय विद्यापीठांचे संघटन ( एआययू ) चे सरचिटणीस डॉ. पंकज मित्तल यांच्यासह राजकीय, सामाजिक, प्रसारमाध्यमे, अभिनय व उद्योग क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर चार दिवस चालणाऱ्या या १०व्या भारतीय छात्र संसदेमध्ये युवक श्रोत्यांना संबोधित करणार आहेत. जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, श्री. तुषार गांधी, प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, अनू आगा, अभय फिरोदिया, जस्टिस एन. संतोष हेगडे, लोबसांग सांग्ये, मार्क टूली, एस. परशुरामन, डॉ. विजय भटकर हे या छात्र संसदेचे मार्गदर्शक आहेत. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहूल विश्वनाथ कराड हे या छात्र संसदेचे संस्थापक आहेत.
सदर कार्यक्रमाची पत्रकार परिषद दिनांक. ३० नोव्हेंबर रोजी मुंबई मध्ये पार पडली. मुंबई पत्रकार भवन मध्ये झालेल्या या पत्रकार परिषदे मध्ये भारतीय छात्र संसद चे पदाधिकारी मयुर मोरे, रवी देशमुख, गौतम रामकृष्णन, दर्शन मोरे आणि अली अकबर उपस्थित होते

Post a comment

 
Top