0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई  |
देशातील अनेक शहरात अस्वस्थता, लोक योग्य वेळी योग्य निर्णय घेतील व देशातून भाजपाला हद्दपार करेल असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशातील 5 व्या राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. सत्तेचा दूरूपयोग करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्नदेखील झारखंडमध्ये झाला. देशची अर्थव्यस्था बिघडलेली. मुळ समस्येपासून दूर जाण्यासाठीच एनआरसी कॅबचा घाट घालण्यात आला असून यामुळे देशाच्या एकतेला यापासून धोका आहे. यामुळेच लोक रस्त्यांवर उतरले आहेत. रस्त्यांवर उतरलेल्या लोकांनी लोकशाही मार्गाने विरोध करावा हिंसक निदर्शने करू नका, असं आवाहनही शऱद पवार यांनी केले.

Post a Comment

 
Top