0
BY - मन्साराम वर्मा ,युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे |
रेल्वेने गरुड, घुबड यासारखे वन्यपक्षी आणि स्टार कासव, सरडे यासारखे प्राणी घेऊन येणार्‍या इसमास वन विभागाने ताब्यात घेतले. मिळालेल्या गुप्त बातमीनुसार कोइम्बतूर-कुर्ला या रेल्वेने एक इसम वन्यपक्षी घेऊन येणार असल्याची बातमी मिळाली होती. त्यानुसार ठाणे रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून रचून ड-1 बोगीमध्ये प्रवास करणारा मोहम्मद खलील रियाज अहमद उर्फ जायद खान (24) रा. गांधीनगर, बँगलोर याच्याजवळ असलेल्या तीन बॉक्सची तपासणी केली. बॉक्समध्ये जाळीच्या पिंजर्‍यात बंदिस्त केलेले पक्षी मिळून आले.यात चार स्टार कासव, तीन गरुड, एक घार आणि एका घुबडाचा समावेश आहे. हे पक्षी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे अनुसूची प्रमाणे संरक्षीत वन्यपक्षी आहेत. त्यांची खरेदी-विक्री करणे, बाळगणे, पाळणे हे वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार बंदी आहे. मोहम्मद खलील याने बंगलोर येथून हे पक्षी आणि प्राणी घेतले असून ठाणे-मुंबई येथे कोणत्या कारणासाठी आणले आहेत याचा तपास चालू आहे.
     ही कार्यवाही उप वनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, ठाणे सहाय्यक वनसंरक्षक (र.रा.प आणि वन्यजीव) गिरजा देसाई-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल ठाणे नरेंद्र मुठे, संजय पवार, वन्यजीव घटक ठाण मनोज परदेशी, हेमंत कारंडे वनपाल, श्री. कुडाळकर, संदिप मोरे, प्रविण आव्हाड, श्री.जाधव, श्री.पाटील यांच्या पथकाने आणि सेव वाईल्ड लाईफ या संस्थेच्या मदतीने केली. पुढील तपास नरेंद्र मुठे करीत आहेत.


Post a Comment

 
Top