0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – सातारा |
भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje bhosle)  यांनी राष्ट्रीय महामार्गाला खड्डे मुक्त न केल्यास या रस्त्यावरील आनेवाडी टोलनाका तोडण्याचा इशारा दिला आहे याबाबत त्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ खड्डे बुजवण्याच्या सुचना केल्या आहेत.
शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आनेवाडी टोल नाक्यावर आज (18 डिसेंबर) आंदोलन झालं. मागील वर्ष भरापासून सातारा-पुणे महामार्गाची दुरावस्था झाली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला रस्ते दुरुस्तीसाठी 15 दिवसांचा अल्टीमेटमही देण्यात दिला होता. मात्र. रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण न झाल्याने अखेर शिवेंद्रराजे भोसले यांनी थेट आनेवाडी टोलनाक्यावर मोर्चा नेला. भोसले समर्थकांनी यावेळी टोल वसुली बंद करत नाक्यावरील वाहने पैसे न घेता सोडली. यावेळी शिवेंद्रराजेंनी वाहन चालकांना टोलनाक्यावर गुलाबाचे फुलही दिले.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा-पुणे महामार्ग सोडला तर इतर रस्ते सुस्थितीत आहेत. मात्र आनेवाडी आणि खेडशिवापूर टोलनाक्याच्या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब असल्याची तक्रार सामान्य प्रवासी करत आहेत.

Post a Comment

 
Top