0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली  |
झारखंड विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी केली जाणार आहे. यानंतर मतदान यंत्रातल्या मतांची मोजणी केली जाईल. या निवडणुकांमध्ये भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात यशस्वी होते की, काँग्रेस बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंडमध्ये प्रचारसभा घेत जोरदार प्रचार केला होता. तर काँग्रेसनेही सत्ता मिळवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. महाराष्ट्रात भाजपला फटका बसला आहे. यानंतर झारखंडमध्ये काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दुपारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Post a comment

 
Top