0
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
'' जसे मिठा शिवाय चव नाही तसेच कणखर प्रशासक अधिकारी शिवाय प्रशासन नाही '' हे एस.जी.तेलतुंबडे साहेबांच्या प्रशासकीय कारकिर्दीतुन दिसून येत आहे.माणूसकी जपत त्यांनी प्रशासकीय कामकाज गेले कित्येक वर्षे केली असून त्यांनी प्रशासनाला अमुल्य योगदान दिले आहे.त्यांच्या कारकिर्दीची मुरबाड,ठाणे,भिवंडी सह अन्य तालुक्यात कार्याची प्रशंसा शासन दफ्तरी नोंद आहे.
            एस.जी.तेलतुंबडे साहेबांनी वेळेला महत्व देत सहदुय्यम निबंधक अधिकारी म्हणून त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात झाली.त्याच ओळखीतून प्रशासकीय कारकीर्द बाब लक्षात घेता त्यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे.त्यांच्या कामकाजेत एकही तक्रार त्या विभागात उद्भवली नाही कारण " त्यांच्या कामाची रूप रेखाच स्वच्छ तांदळयासारखी पारदर्शी " आजतागायत राहिली आहे.व्यक्तीमत्व जोपासत नैतिकता व नितीमत्ता टिकवणार्‍या एस.जी.तेलतुंबडे साहेबंची प्रतिमा आजही सर्वसामान्य जनतेच्या मनत घर करून बसली आहे.त्यांच्या कालावधीत कोणताही अनुकुचित प्रकार घडला नाही याची खात्री तेथील विभागातील अधिकारी,कर्मचारी वर्ग तसेच महाराष्ट्र शासनाला आजही आहे.
     पैसा सर्वस्व नसून माणूसकी व जबाबदारी प्रथम असल्याची मनोधाारणा बाळगणारे एस.जी.तेलतुंबडे साहेबांची कणखर प्रशासक म्हणून पनवेल येथे नियूक्ती करण्यात आली हे.त्यांच्या कामात शिस्त व कणखर बाणा असून त्यांचे पनवेल मध्ये असा निर्भिड प्रशासक लाभल्याने त्यांचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे.त्यांच्या कामाची गती वेगवान असून त्या गतीत बारकार्इचे लक्ष व परखडपणा तसाच आहे.जागा जरी बदलली असली तरी निर्भिड कार्य मात्र तसेच राहिले आहे.एक प्रकारचे कर्तव्यदक्षाची भुमिका साकारणे म्हणजे नायक होय असा नायक जेव्हा प्रशासक अधिकारी म्हणून जेव्हा लाभतो तेव्हा जनसामान्यांची सेवाच होते आणि अशी सेवा एस.जी.तेलतुंबडे साहेबांच्या कार्यातून आजतागायत दिसून आली आहे.
     एस.जी.तेलतुंबडे यांच्या कारकिर्दीत कोणाही शेतकरी,नागरिकावर अन्याय झाला नाही.ज्यानी शेतकरी बांधवावर अन्याय केला अशा अन्यायाला त्यांचे प्रशासकीय चोख उत्तर मिळाले आहे.अशा निर्भिड,कणखर,कर्तव्यदक्ष,प्रशासकीय जागता पाहरा असणार्‍या एस.जी.तेलतुंबडे साहेबांना पुढिल वाटचालीस आम्ही शुभेच्छा देत आहोत.
----------------------------------------------------
भेरे मामा देतात मदतीचा हात...
सहदुय्यम निबंधक कार्यालय भिवंडी येथिल विभागात गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना मार्गदर्शन करत मदतीचा हात दिला आहे.भेरे ही व्यक्ती माणूसकी जपणारी आणि शिस्तप्रिय आहे.त्यांनी हाती घेतलेले काम पुर्ण झाल्याशिवाय दुसर्‍या कामात हात घालत नाहीत कारण कामात कोणत्याही प्रकारे अडचण शेतकरी बांधवाला येऊ नये म्हणून त्यांच्या कार्याची पावती संपुर्ण भिवंडी तालुक्यासह शहापूर तालुक्यातही माहिती आहे.कधीही कोणाला दुखवले नाही तर प्रत्येकांच्या मनात आपले कौटूंबिक घर बनविले आहे.भेरे यांच्याकडे मनमिळावू आणि आदराचे मार्गदर्शन असून त्यांच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे असे येथिल नागरिकांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.
----------------------------------------------------Post a Comment

 
Top