0
BY,कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव्ह,मुरबाड |
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिटनेस किंगमेकर म्हणून मुरबाड तालुक्यातील परेश हिंदुराव यांची ओळख आहे.परेश हिंदुराव यांनी आपल्या जीवनात शरीर शौष्ठवाला महत्वपुर्ण दर्जा दिला असून अनेक तरुणांना फिटनेस बॉडी बनविण्यासाठी त्यांचे योगदान कार्यशील राहिले आहे.
फिटनेसमध्ये सर्व अभ्यास प्रशिक्षणात अग्रेसर म्हणून परेश हिंदुराव यांना ओळखले जाते.मुरबाड सारख्या ग्रामीण भागातून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात विविध शरीर शौष्ठवात प्राविण्य मिळवत यश संपादन केले आहे.त्यांच्या कारकीर्दीत मुरबाड मध्ये अल्पदरात बॉडी फिटनेस प्रशिक्षण दिले जाते.अशा नामवंत बॉडी किंगमेकर चा वाढदिवस काल मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी समस्त प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व बॉडी बिल्डर युवकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत पुढिल वाटचालीस मनपूर्वक व उदंड आयुष्याच्याही शुभेच्छा दिल्या.यावेळी मोठ्या संख्येने युवक वर्ग यांची उपस्थिती होती.

Post a comment

 
Top