0
BY - प्रणव भांबुरे,युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
हैदराबाद मध्ये डॉ. प्रियांका रेड्डी सोबत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशात चीड व्यक्त केली जात आहे पण या पुढे कोणी दुसरी प्रियांका बनू नये म्हणून महाराष्ट्र पोलिस सतर्क झाली आहे. कल्याण पोलिसांच्या वतीने पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी काही सामाजिक महिलांशी सुरक्षेबाबत चर्चा केली. महिलांकडून त्यांची मते देखील घेण्यात आली. हैदराबाद मध्ये घडलेली घटना कोणासोबत कधी ही आणि कुठे ही घडू शकते त्यामुळे आपल्याला नेहमी सावधान आणि सतर्क राहण्याची गरज आहे असे DCP पानसरे यांनी सांगितले. तसेच 'दामिनी पथक' आणि 'महिला सतर्कता टीम' तसेच सुरक्षे संदर्भात सर्व माहिती देखील देण्यात आली म्हणजे वेळ पडल्यावर त्याचा वापर करता येईल. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी अशा कठीण प्रसंगी सर्वात आधी 100 या नंबरवर फोन करण्याची सूचना दिली तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत चव्हाण यांनी महिलांनी सहजरीत्या कोणावर ही विश्वास टाकू नये सतर्क राहावे असे सांगितले. यावेळी छाया वाघमारे, पुष्पा रत्नपारखी, अनिता पाटील, नंदिनी साळवे व अनेक सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Post a Comment

 
Top