0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नवी दिल्ली |
उन्नाव येथील बलात्कार पीडितेची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. शुक्रवारी रात्री दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. बलात्कार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींकडून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये ती 90 टक्क्यांपेक्षा अधिक भाजली होती. यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री 11.40 च्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात ती आयुष्याच्या लढाईत अपयशी ठरली. कार्डिअॅक अरेस्टमुळे तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. यापूर्वी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

Post a comment

 
Top