0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुबई |
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. यामध्ये काँग्रेसचे 10 आणि शिवसेना व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 13 मंत्री शपथ घे आहेत. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. त्यांनी या सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. भाजपासोबत सरकार स्थापन करत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला होता. मात्र अवघ्या 3 दिवसांत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. आज 34 दिवशी मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. शपथविधीला सुरुवात झाली आहे. काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मिळून एकून 36 मंत्री यावेळी शपथ घेत आहेत. यामध्ये 25 कॅबिनेट मंत्री, 10 राज्यमंत्री तर एक उपमुख्यमंत्री असे 36 मंत्री शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते अजित पवार यावेळी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये अजित पवारांनी सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Post a comment

 
Top