0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड जवळील धानिवली येथील टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या कापसाच्या गोदामात एका कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी ता 8 सकाळी उघडकीस आली. मकनू उर्फ रणजित कांता भारद्वाज वय 39 असे आत्महत्या केलेल्या कामगारांचे नाव आहे. त्याने बंद गोडाऊन मध्ये रात्रीच्या वेळी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती कंपनीचे रखवालदार रवींद्र शुक्ला यांनी पोलिसांना दिली. मात्र हा कामगार बंद गोडाऊन मध्ये रात्री गेला कसा ? याची कंपनीत चर्चा सुरु असून त्याच्या आत्महत्येचे कारण अजून कळलेले नाही. सदर कामगार गायकर यांच्या ठेकेदारीत काम करत असल्याचे काही कामगारांनी सांगितले. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या पुर्वी महिलांची सुरक्षा ,बलात्कार,खुन असे अनेक गुन्हे या टेक्नोक्राफ्ट कंपनी मध्ये घडले आहेत.या घटनेच्या बातम्या आमच्या चॅनेलने सातत्याने दाखवुन गुन्हयामागचे  आरोपीना गजाआड करण्याची मागणी केली होती.मात्र येथील यंत्रणा कुचकामी पडली असुन कंपनीचा मॅनेजर व मालक हे येथील गुन्हा दडपण्यासाठी यंत्रणेला आपल्या पैसाच्या जोरावर खिशात घालुन फिरवत आहेत. ही कंपनी बंद करून येथील घडणार्‍या घटनेची वाट थांबवावी नाहीतर या अशा बलात्कार ,खुन ,आत्महत्याच्या घटनेला जोर वाढेल व हाच सराफ आपल्या पैसाच्या तोलावर यंत्रणेला नाचवत राहील.म्हणुन ही गुन्हयाची कंपनी बंद करा अशी मागणी येथील जनतेने सरकारकडे केला आहे. 

Post a Comment

 
Top