0
BY -युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड येथिल मातानगर येथील रस्त्याचे काम करण्यात आले असून हा रस्ता अरूंद ठेवण्यात आला असून काम अपुर्ण ठेवण्यात आला आहे.एकाचवेळी दोन वाहने जात नाहीत ठेकेदाराने गौडगंबाल करत ठेकेदाराने हा रस्ता अरूंदच ठेवला आहे व बिल  मोकळा झाला आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभाचे मुरबाड शाखा अभियंता व सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांचे कार्यकारी अभियंता यांचे दुर्लक्षतेने हा सदरचा रस्ता अरूंदच राहिला आहे.सदर सोसायटीच्या नावे हा काम करण्यात आला असून ती सोसायटी शहापूरची असल्याचे कळून येत आहे.या कामाची पाहणी केली असूनही सदरचा रस्ता अरूंदच कसा राहिला असा प्रश्‍न करण्यात आला असून या ठेकेदारानी केलेल्या गणेंशनगर ते मातानगर रस्त्याच्या कामाची चौकशी करून भ्रष्टाचार करणार्‍या ठेकेदार अधिकार्‍यांवर तसेच संबंधितांवर तात्काळ कारवार्इ करावी अशी मागणी येथिल सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे.

Post a comment

 
Top