web-ads-yml-750x100

Breaking News

मुलं रंगली स्नेहसंम्मेलनात ; मुरबाड तालुक्यातील बुरसुंगे येथिल जी.आर.पाटील विद्दयामंदिर शाळा व महाविद्दयालयात वार्षिक स्नेहसंम्मेलन संपन्न

BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |

" आस नवा,ध्यास नवा ,चला होऊया आनंदी जी.आर.पाटील  महाविद्दयालयाच्या  स्नेहसंम्मेलनात मुलं ही रंगली " दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही मुरबाड तालुक्यातील बुरसुंगे येथिल जि.आर.पाटील विद्दयामंदिर शाळा व महाविद्दयालयात वार्षिक स्नेहसंम्मेलन संपन्न झाला.
या स्नेहसंम्मेलनात लहान वयोगटापासून युवा तरूणांनी नृत्यकला,नाटयकला,गायन,असे अनेक विविधांगी भारतीय वेषभूषा परिधान करत सहभाग नोंदवला.यामध्ये लहान मुलांनी वडापाव,भेळ,खेळ भरणा,सरबताच्या प्रकाराचे स्टॉल,सालेड पदार्थ असे विविध स्टॉल लावून आगळा वेगळा स्नेहसंम्मेलन साजरा केला.
या स्नेहसंम्मेलनात सहभागी विद्दयार्थी व विजेते विद्दयार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सर्व विद्दयार्थ्यांचे मान्यवरांनी कौतूक केले असून या स्नेहसंम्मेलनाला शाहीचे सरपंच अरूण भोर्इर,बुरसुंगेचे सरपंच काशिनाथ दळवी,शाही पोलिस पाटील प्रभाकर वारघडे,एम.एस.पी.मंडळाचे अध्यक्ष ठाकूर मॅडम,सचिव  सुनिल पाटील सर,कर्तव्यदक्ष आणि गुरू म्हणून ज्यांची तालुक्यात ओळख आहे असे प्राचार्य ज्ञानेश्‍वर विशे सर,एच.एम.भोर्इर मॅडम,मधुकर गणू भोर्इर सर यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सांगता झाल्यावर स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी पाल्यासोबत आपल्या पालकांनी,व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थिती दाखवत या स्नेहसंम्मेलनाची शोभा वाढविली.

No comments