0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी |
अंधार कितीही असला तरी ज्योत ही अंधाराला झाकते हे कटू सत्य कोणीही बदलू शकत नाही त्याचप्रमाणे तेव्हा ही देवा मदतीसाठी पुढे होता आणि आजही देवा ग्रुप फाऊंडेशन देवा ढोले यांच्या नावाने प्रभावीपणे सामाजिक कार्य करतांना संपुर्ण महाराष्ट्रात पुढेच असल्याचे निदर्शनास आले आहे.
            देवा ग्रुप फाऊंडेशन ही अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवणारी महाराष्ट्रातील नावलौकिक ठरलेली संघटना आहे.त्यांच्या कार्यात जात पात हा शब्द कधी आलाच नाही.मदतीसाठी आम्ही आणि आमच्या कार्यात गोडी ही वाव खरी ठरली आहे.आज हाक म्हणजे देवा ग्रुपची साथ असे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. 

देवा ग्रुप फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजितशेठ (पप्प्याभाऊ) ढोले यांच्या अधिपत्याखाली व महाराष्ट्राचे लाडके तरूण वर्गाचे मार्गदर्शक तथा देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे,तरूण वर्गांचे स्नेही अविनाश(गोटयाभाऊ) फोडसे यांच्या प्रेरणेने आज महाराष्ट्रात सामाजिक कार्याची धुरा सुरू आहे.असा गाव नाही तेथे देवा ग्रुप नाही आणि असा गरजू व्यक्ती नाही ज्याला फाऊंडेशनकडून मदत मिळाली नाही.सत्याची वाटचाल देवा ग्रुप फाऊंडेशन करित असून लाखो तरूणांची साथ या फाऊंदेशनला मिळत आहे.चांगली शिकवण या फाऊंडेशनचे मुख्य उद्देश असून यातून चांगली संगत निर्माण झाली आहे.अशीच शिकवण घेऊन मुंबर्इतील चांदिवली तरूण वर्गांनी गोरगरिब परिवाराला देवा ग्रुप फाऊंडेशन कौटूंबिकतेची ऊब दिली आहे.थंडीच्या दिवसात थंडी पासून बचाव करण्यासाठी चादरीचे वाटप केले तर त्याचबरोबर अन्न दान वाटप केले आहे.
 

त्यांच्या कार्याची चर्चा सर्वत्र होत असून पुन्हा एकदा मुंबर्इमध्ये देवा ग्रुप फाऊंडेशनचे नावलौकिक झाले आहे.यामध्ये देवा ग्रुप फाऊंडेशनचे अकलेश पाल,गंगाधर कुंभारे,अक्षय गुरव,राज यादव,सुयोग्य वारनग,अक्षय जयस्वाल,सुमित भारद्वाज ,अमित झा,विश्‍वजित कदम महिला पदाधिकारी पुजा चव्हाण यांनी विशेष सामाजिक कार्याची मोहिम राबविल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.त्यांच्या प्रशंसेमध्ये पुन्हा एकदा पुन्हा एकदा देवा ग्रुप फाऊंडेशनचे नाव उंचशिखर गाठतांना दिसत आहे.तरूण वर्गांचे मार्गदर्शक तानाजीभाऊ मोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करित त्यांच्या पुढिल कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a comment

 
Top