0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई । 
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी स्थापन करण्यात आलेल्या रायगड प्राधिकरणाच्या कारभारात गेली 2 वर्षे ठेकेदार खाबूगिरी करत असल्यामुळे रायगड किल्ला प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहेत. पण राज्यात नवीन सरकार आल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन प्राधिकरणाच्या सर्व कारभाराबद्दल सविस्तर चर्चा करणार आहेत. यासाठी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर भेट घेणार आहे.


Post a comment

 
Top