0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – भाईंदर, मुंबई |
पोलिसाच्या दबावाला कंटाळून भाईंदर येथे एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रमेश पाठक (51) असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रमेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. ज्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि दोन इतर लोकांच्या नावाचा उल्लेख केला होता. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करत आहेत.मयत रमेश पाठक यांनी आपले घर 2013 मध्ये नयना यांना हेवी डिपॉझीट तीन लाख रुपयामध्ये भाड्याने दिले होते. दोन वर्षापूर्वी रमेश यांनी नयना यांचे डिपॉझीट केलेले तीन लाख रुपये परत दिले. पण नयना यांच्याकडून रमेश यांनी कागद पत्र घेतले नाही. त्यानंतर कालांतराने पैसे देऊनही नयना त्यांचा मुलगा लालू आणि पोलीस कदम यांनी रमेश पाठक यांच्याकडे पैसे मागू लागले. रमेश यांनी नकार दिल्यामुळे सतत त्यांच्यावर दबाव टाकून पोलीस स्टेशनची भीती दाखवली जात होती.
या सततच्या दबावामुळे कंटाळून रमेश पाठक यांनी गळफास राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी पोलीस कर्मचारी, नयना आणि तिच्या मुलाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या आत्महत्येचे कारण उघडकीस झाले. भाईंदर पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.

Post a Comment

 
Top