0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |

दैनिक जनादेशचे पत्रकार अजय जाधव यांचे वडील दत्ताराम गंगाराम जाधव यांचे 12 डिसेंबर 2019 रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांचे वय 71 वर्षे होते. रात्री उशिरा त्यांच्यावर जवाहरबाग वैकुंठधाम येंथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ठाणे, मुंबई आणि सुधागड तालुक्यातील जनपरिवार मोठया संख्येने उपस्थित होता. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे व दैनिक जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांनी शोकाकूल भावना व्यक्त करीत दत्ताराम जाधव यांनी श्रद्धांजली वाहण्यात आली.दत्ताराम जाधव हे मुळचे सुधागड तालुक्यातील आसरे गावचे सुपरिचित व्यक्तीमत्व होते. वयाच्या 10 व्या वर्षी ते आपल्या वडिलांसोबत नोकरीनिमित्त ठाण्यात आले. ठाण्यात रायगडआळीत स्वतःचा सायकल मार्टचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर काही वर्षे कॅस्टल मिल येथील लविना कपूर इंडस्ट्रीमध्ये त्यांनी काम केले. त्यानंतर नोकरीनिमित्त तारापूर येथेही स्थलांतर केले. अत्यंत मनमिळाउ स्वभाव आणि माणसे जोडण्याची आवड असलेल्या जाधव यांनी आपल्या मुलांनाही तिच शिकवण दिली. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघामध्ये आपल्या दोन्ही मुलांना काम करण्यास झोकून दिले. स्वतःदेखील शेवटपर्यंत संस्थेच्या कार्यालयात सेवा देत राहिले.

Post a comment

 
Top