0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – भिवंडी, ठाणे |
भिवंडीत एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करुन दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना भिवंडीतील कारीवली ग्रामपंचायत येथील सुभाष नगर परिसरात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.ही आठ वर्षीय मुलगी काल (21 डिसेंबर) रात्री साडे नऊच्या सुमारास घरा बाहेर खेळत असताना ती आईस्क्रीम विकणाऱ्या गाडीजवळ आईस्क्रीम खरेदीसाठी गेली. पण त्यानंतर ती घरी परतली नाही. ती घरा बाहेर खेळत असताना तिचे अज्ञात नराधमाने अपहरण केले. त्यानंतर घरापासून 50 ते 60 मीटर अंतरावर असलेल्या मोकळ्या जागेतील झुडपात तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या केली.

मुलगी रात्री साडे नऊ वाजल्यापासून घरी न आल्यामुळे तिचे आई-वडील रात्री दोन वाजेपर्यंत आपल्या मुलीचा शोध घेत होते. मुलीचा शोध लागत नसल्यामुळे घरच्यांनी थेट पोलिसांना कळवले. त्यानंतर सकाळी सहा वाजताच्या सुमारास तेथील झुडुपात शौचास गेलेल्या व्यक्तीस चिमुरडीचा मृतदेह आढळला. (Rape on minor girl bhiwandi)  त्याने तातडीने ही माहिती मृत मुलीच्या कुटुंबीयांना दिली. चिमुरडीचा मृतदेह पाहता तिच्या कुटुंबियांनी टाहो फोडला. आपल्या मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी हत्या झालेल्या पीडितेच्या आईने केली आहे.या घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. 

Post a Comment

 
Top