0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – केरळ |
जगीज् कूकबुक’ या कुकरी शोमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली प्रसिद्ध मॉडेल आणि सेलिब्रिटी शेफ जगी जॉन हिचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. राहत्या घरातील किचनमध्ये जगी मृतावस्थेत सापडली. मात्र तिच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही.
जगी जॉन केरळमधील कुर्वणकोनममध्ये आईबरोबर राहत होती. जगीचा मृतदेह दुपारी चार वाजताच्या सुमारास तिच्या मित्रांनी पाहिला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.
     जगीच्या शरीरावर कोणतीही जखम आढळलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच जगीच्या मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.

Post a comment

 
Top