0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
महाविकास आघाडी सरकारमधील खातेवाटप आज जाहीर करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा होती. यानुसार आज हे खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपानुसार शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या शपथविधी झालेल्या प्रत्येकी दोन मंत्र्यांना विविध खात्यांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे गृह,नगरविकास, वन, पर्यावरण, पाणीपुरवठा जलसंधारण सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे. तर सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग, उच्च तंत्रशिक्षण, कृषी, रोजगार हमी योजना, परिवहन खात्याची जबाबदारी असेल. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, उत्पादन शुल्क, अन्न व औषध प्रशासन खाते देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जयंत पाटील यांच्यावर वित्त, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार, अन्न नागरी पुरवठा आणि कामगार या खात्यांची जबाबदारी असेल. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, ऊर्जा, वैदकीय शिक्षण, शालेय शिक्षण आणि पदुम खाते असून नितीन राऊत यांना सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून), आदिवासी महिला बालविकास, मदत व पुनर्वसन खाते देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त सर्व खाती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील.
खातेवाटप पुढीलप्रमाणे
एकनाथ शिंदे- गृह नगरविकास, वन, पर्यावरण, पाणीपुरवठा जलसंधारण सार्वजनिक बांधकाम
छगन भुजबळ- ग्रामविकास, जलसंपदा, सामाजिक न्याय, उत्पादनात शुल्क, अन्न व औषध प्रशासन
बाळसाहेब थोरात- महसूल, ऊर्जा, वैदकीय शिक्षण, शालेय शिक्षण आणि पदुम
सुभाष देसाई - उद्योग, उच्च तंत्रशिक्षण, कृषी, रोजगार हमी योजना, परिवहन
जयंत पाटील- वित्त, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार, अन्न नागरी पुरवठा आणि कामगार
नितीन राऊत- सार्वजनिक बांधकाम (उपक्रम वगळून), आदिवासी महिला बालविकास, मदत व पुनर्वसन

उद्धव ठाकरे- या व्यतिरिक्त सर्व खाती मुख्यमंत्र्यांकडे

Post a comment

 
Top