0
BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड तालुका खरा देशाचा इतिहास आहे.महाभारताची ओळख,रामराज्याची कहाणी,स्वातंञ्याची मुहुर्तमेठ,संविधानाची लोकशाही,यांची मुहुर्तपेठ रचनार्‍या महामहंत,स्वातंत्रवीर,महामानव यांच नातं मुरबाडकरांशी जोडलेले आहे अशा शब्दात महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवाजनी चंदे यांनी पत्रकारांनी मशाली पेटवण्याचे आवाहन केले आहे.
            शब्द मशाल वृत्तपत्राच्या दुसर्‍या वर्धापणदिनी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चंदे बोलत होते.सितेचा महाभारत,अजापर्वत,सहृयाद्रीच्या पर्वत रांगा,माळशेजघाट,गोरखगड,हुतात्मांचे सिध्दगड,वीर हुतात्मा भार्इ कोतवाल,हिराजी पाटील,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असे बरेच काही इतिहासाची साक्ष असलेला मुरबाड तालुक्यातील पत्रकार बाणाचे कौतूक भगवान चंदे यांनी करून ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांच्या संघर्षमय पत्रकारिता आणि शहापूरमधील पत्रकारितेचे अनुभव गुणित केले.
            पत्रकारांनी एकत्रित संघटीत व्हावे,पत्रकारांची शक्ती फार मोठी असते.एक पत्रकार काय घडवू शकतो त्याचं उदाहरण महाराष्ट्र शासन आणि पत्रकारांच नाव संजय राऊत आहे असं ठणकावून सांगून पत्रकारांच्या बाजुने आम्ही सदैव उभे राहू असेही त्यांनी आपल्या संवादात सांगितले.
            मुरबाडचा इतिहास नोंद होर्इल असे लिखान व्हावे अशी इच्छा व्यक्त करून बाबुची कहाणीही कथन केली.शब्द मशालचे किशोर गायकवाड,सुरेश भालेराव यांच कौतूक करून शब्दात मशाल पेटवा असे आवाहन यावेळी केले.यावेळी व्यासपिठावर नगरसेवक रविंद्र देसले,मोहन भावार्थे अन्य मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी पत्रकारांनी सत्यता मांडून निर्भिड लिखाण करावे,सत्य लिहील्यावर आरोप,प्रत्यारोप रागरोष होतो याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले पाहिजे,पत्रकारांच्या बाजुने आम्ही सदैव पाठिशी उभे राहू असे सेक्युलरचे नेते रविंद्रजी चंदने यांनी केले तर व्यासपिठावर आण्णा साळवे युवक आर.पी.आय नेते,बार असोसिएशनचे अ‍ॅड.संतोष झुंझारराव,भाजपा तालुकाध्यक्ष जयवंत सुर्यराव,वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोराटे,ठाणे जिल्हापरिषदेचे उपाध्यक्ष सुभाषदादा पवार,सिडकोचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते प्रमोदजी हिंदूराव यांनी पत्रकारांच्या लेखनीचे गुणगौरव करून पत्रकारांनी निर्भिड,विकसीत लिखान करावे, आपल्या पाठिशी आम्ही सदैव उभे आहोत असे अभिवाचन दिले यावेळी पत्रकारितेत योगदान देणार्‍या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसेच गुणवंत कार्यशील अधिकारी,कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.शब्द मशालचे संपादक सुरेश भालेराव,कार्यकारी संपादक किशोर गायकवाड यांनी प्रास्ताविक व आभार मानले.ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर दळवी(आणा) यांच्यासह जयदिप अडाईंगे ईंगे,रूण ठाकरे,सुनिल भालेराव अन्य पत्रकारानी कार्यक्रमाला यशस्वी करण्यास मदत केली.


Post a Comment

 
Top