0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यात विविध विकास महामंडळे आहेत, त्यात महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांनी प्रशिक्षणासाठी पुढे शासन त्यांना मदत करण्यास तयार आहे असे मत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने वांद्रे येथील गृहनिर्माण भवन येथे आयोजित कार्यक्रमात माँसाहेब मीनाताई ठाकरे अन्नपूर्णा व्हॅनचा लोकार्पण सोहळा तसेच महामंडळाच्या संकेतस्थळ उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आदित्य ठाकरे होते. मंचावर माविमच्या अध्यक्षा श्रीमती ज्योति ठाकरे, व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा, माविमच्या अशासकीय सदस्य शलाका साळवी, संचालक रितू तावडे आदी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सामाजिक उपक्रमास शासनाचे कायम पाठबळ असेल. राज्यातील विविध महामंडळे महिला सबलीकरणाचे काम करत असतात त्यांच्यात समन्वय असणेही गरजेचे आहे, असे प्रतिपादीत करुन त्यांनी माविमच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या.आमदार आदित्य ठाकरे म्हणाले, शेतकरी तसेच ग्रामीण, आदिवासी भागातील महिलांसाठी माविमने भरीव कार्य करावे. या महामंडळाचे कार्यक्षेत्र राज्यभर विस्तारण्यासाठी जे - जे काही करता येईल ते करू. प्लॅस्टिक बंदीमध्ये चांगल्या दर्जाच्या कापडी पिशव्या या महामंडळाने तयार करत वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 10 रुपयांची थाळी, सॅनिटरी नॅपकिन अशा विविध योजना राबविण्यासाठी माविमचे सहकार्य घेता येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

 
Top