0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – अकोला |
नुकतीच 10 वी(फिन्निश बेसबॉल ) पेसापालो विश्वचषक स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत अकोटच्या मराठमोळ्या श्याम मिरगे याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील या विश्‍वचषक स्पर्धेत  चमकदार कामगिरी केली.  या चमकदार कामगिरीने आकोटची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आहे.श्याम पांडुरंग  मिरगे हा मुळचा अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सौदळा येथील रहीवासी आहे.तर श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथे शिकत आहे.
या वर्षी प्रथमच भारतात पुणे येथे पेसापालो विश्वचषक स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र मंडळ क्रीडा स्टेडियम,पुणे येथे  करण्यात आले होते. या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया सोबत झालेल्या सामन्यांमध्ये  भारतीय संघासाठी त्याने उत्कृष्ट कामगिरी करत  ब्राँझ मेडल पटकावण्यात यश मिळवले आहे.
        या स्पर्धेत भारत,स्वीडन,स्विझरर्लंड,फिनलंड,ऑस्ट्रेलिया,नेपाळ,बांगलादेश,श्रीलंका,भूतान हे देश सहभागी झाले होते.श्री शिवाजी कृषी जेवतंत्राद्यान,अमरावतीचा विद्यार्थी आहे. पेसापालो राज्य व राष्ट्रस्तरीय रोप्य पदक विजेता श्याम पांडुरंग मिरगे यांची वरिष्ठ गट भारतीय संघात निवड झालेली आहे .या स्पर्धेसाठी श्याम मिरगे यांनी  आसाम,राजस्थान,छत्तीसगढ येथील  आंतरराष्ट्रीय शिबीर यशश्वी रित्या पार पाडत भारतीय संघात आपली जागा निश्चित केली होती.विशेष म्हणजे,या शिबिरात संपूर्ण भारतातून 112 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.गेल्या वर्षी झालेल्या आशिया पेसापालो स्पर्धेत श्यामचा समावेश भारतीय संघात करण्यात आला होता .प्रा. संदीप बोबडे  नीरज बोबडे व मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे . त्याने आपल्या यशाचे श्रेय भारतीय पेसापालो महासंघाचे अध्यक्ष चेतन पगावड,महाराष्ट्र पेसापालो असोसिएशनचे जॉईन सेक्रेटरी .तूषार देशमुख,प्रतीक देशमुख तसेच  श्री शिवाजी कृषी जेवतंत्रज्ञान महाविद्यालय,अमरावतीच्या प्राचार्य भारसाकडे मॅडम व प्रा.अतुल डांगे व प्रा.नितीन इंगोले व नॅशनल स्टुडन्ट युनिओन ऑफ इंडिया चे अमरावती जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांनी श्याम अभिनंदन करत कौतुक केले आहे.

Post a comment

 
Top