0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – दिल्ली |
क्रौर्याची परीसीमा गाठलेल्या उन्नाव सामूहिक बलात्कारप्रकरणी दिल्ली न्यायालयाकडून निलंबित भाजप आमदार कुलदीप सेंगरला दोषी ठरवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे २०१७ मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी भाजपचे निलंबित आमदार कुलदीपसिंह सेंगर याच्यावर अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या गाडीवर ट्रक घालून तिला संपवण्याचा प्रयत्न भाजप आमदार कुलदीप सेंगरकडून करण्यात आला होता. येत्या १९ डिसेंबरला त्याच्यावर आरोप निश्चित होणार आहेत.
उन्नाव येथे २०१७मध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. आमदार कुलदीपसिंग सेंगर याच्यावर या बलात्काराचा व अपहरणाचा आरोप होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हा खटला लखनऊ येथील न्यायालयातून दिल्ली न्यायालयात वर्ग करण्यात आला होता. ५ ऑगस्टपासून या खटल्याची दैनंदिन सुनावणी होत आहे. या प्रकरणी सेंगर व सहआरोपी शशी सिंग याच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणे, अपहरण, बलात्कार आदींशी संबंधित कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Post a Comment

 
Top