0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – कल्याण |
कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे. प्रमोद पाटील यांनी आपल्या मुलासाठी जवळपास सव्वा कोटीची मुश्तानग (mustang) कार घेतली होती. ही मंगळवारी रात्री राजू पाटील यांचा ड्रायवर खदिर इनामदार हा ही गाडी घेऊन काही राजू पाटील यांच्या नातेवाईकांना सोडण्यासाठी डोंबिवली स्टेशनला गेला होता. गाडी घेऊन परत येताना जुन्या पलावा रेल्वे पुलावर खड्डा चुकवताना ड्रायव्हरचा ताबा सुटला तितक्यात गाडीचे एयर बॅग खोलल्याने कार खाली दिवा पनवेल मार्गावरील ट्रकवर गेली. चालकाने गाडीतून उडी मारल्यामुळे सुदैवाने तो बचावला आहे. मात्र मानपाडा पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून क्रेनच्या साहाय्याने गाडी बाहेर काढली. 'मुश्तानग' ही जवळपास 75 लाख रुपयांची गाडी होती. ठाणे जीआरपी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Post a comment

 
Top