0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर |
आज सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश सुरू होत आहे. हे अधिवेशन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन पेटणार आहे. यासोबतच सावरकरांविषयी राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधीपक्षाने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. या मुद्द्यांवरुन अधिवेशन चांगलेच तापण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार अशा घोषणा निवडणुकांच्या काळात देण्यात आल्या होत्या. मात्र अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी 25 हजार रुपयांच्या मदतीची मागणी विरोधी पक्षांनी केली. यासोबतच सावरकरांच्या अवमानाच्या मुद्दय़ावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. यासोबतच आम्ही वचन पाळणारे लोक आहेत. शेतकऱ्यांसाठी लवकरच चांगला निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देत भाजपच्या सावरकरप्रेमावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

Post a comment

 
Top