0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
विधानसभा निवडणुकीनंतर ऐतिहासिक राजकीय नाट्य राज्यात घडल्या. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. हा विस्तार अखेर चौतिसाव्या दिवशी होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण 36 नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल अशी आशा आहे.या मंत्रिमंडळता कोणत्या पक्षाच्या पारड्यात कोणते खाते पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीमधून बंड पुकारत भाजपशी हात मिळवणी केलेल्या अजित पवार यांच्याकडेच उपमुख्यमंत्रीपद सोपविण्यात येणार आहे. तर राष्ट्रवादीकडून बहुतांशी जुन्याच चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेनेने आपला मुंबईचा पाया अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे. काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणेच शेवटपर्यंत घोळ सुरू होता.शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या मंत्र्यांचा सोमवारी दुपारी 1 वाजता विधान भवनाजवळ शपथविधी होणार आहे. कायद्यानुसार राज्यात मुख्यमंत्र्यांसह 43 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ करता येत असते. पहिल्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह सात जणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे आणखी 36 जणांचा समावेश करता येऊ शकतो. शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपल्या वाटय़ाला आलेल्या सर्व जागा भरण्याचा निर्णय घेतला. मात्र काँग्रेसमध्ये गोंधळ आहेच.मुंबईत विधानभवनाच्या प्रांगणामध्ये सोमवारी दुपारी एक वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नव्या मंत्र्यांना शपथ देतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून रविवारी रात्री उशिरा मंत्र्यांच्या नावांची यादी राजभवनावर पाठवण्यात आली आहे. शामियाना उभारून शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांच्या दिमाखदार शपथविधी सोहळा शिवाजी पार्कवर पार पडला होता.


Post a comment

 
Top