0
BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड |
आपली सत्ता आणि आपलाच दबाव यावर आमदार खासदारांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मनमानीने म्हणा किंवा भ्रष्टाचार तसेच अधिकार्‍यांना आपल्या हातातील बाहुलीसारखे नाचविण्यासाठी आपली आमदार,खासदारकी पदाच्या जीवावर माझ्या विभागात माझ्या शिफारसीचा अधिकारी हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे या महत्वाच्या बाबीकडे प्रामुख्याने लक्ष घातले जात नाही आणि बळीचा बकरा अधिकारी होतो.
प्रशासक नायक भुमिकेचा अधिकारी आमदार खासदार नाचणारा बाहुला जेव्हा करतो तेव्हा अधिकारी हा अधिकारी नसतो तो खेळणा बनतो अशा अधिकार्‍यांना आमदार खासदार शिफारसीने आणतात आणि कणखर भुमिकेचा अधिकारी गुलाम होऊन संगणमत करतो असे प्रकार सध्या निदर्शनास आल्या आहेत.विविध शसकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविले जात नाहीत,पालकमंत्री,आमदारांच्या आमसभा होत नाहीत याकडे अधिकारीही लक्ष केंद्रीत करित नाहीत.आरोग्याच्या समस्या,स्वच्छता अभियान,सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचार,कृषी मध्ये बोगस कामे शेतकरी बांधवांना न मिळणार्‍या योजना त्यामध्ये भ्रष्टाचार,तहसिल अंतर्गत सर्व कामे,वनविभागात होणारा भ्रष्टाचार,जिल्हापरिषदमध्ये कामे अपुर्ण त्यात भ्रष्टाचार,पंचायत समिती अंतर्गत ग्रामीण भागातील कामे व योजनांमध्ये भ्रष्टाचार,बोगस डॉक्टरावर तक्रारी असून कारवार्इ शुन्य,गॅस सबसिडी मध्ये भ्रष्टाचार,कंपनीमध्ये मेलेला कर्मचारी त्याला न्याय मिळवून देण्याकरिता प्रशासक अधिकारी यांचे संगणमतीने दुर्लक्ष,जुगार मटका गुटखा डिलरवर कारवार्इ एैवजी टक्केवारीने पोलिस प्रशासकांची हातमिलवणी अशा अन्य महत्वपुर्ण घडनार्‍या घटनेत आमदार खासदारांनी निवड करून आणलेला अधिकारी मनाप्रमाणे खुर्चित बसविल्याने सदरचा भ्रष्टाचार वाढला असून याकडे राज्याचे पारदर्शक मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी या सबब विषयावर गांभिर्याने लक्ष वेधून आमदार खासदाराच्या शिफारसीने शासकीय व निमशासकीय खुर्चिवर बसविलेल्या अधिकार्‍यांची,निरक्षिकांची तात्काळ बदली करण्याचे परिपत्रक जाहिर करावे 
त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सरकारचे एक पाऊल पुढे असल्याचे ठसे उमटविण्यासाठी आणि महाराष्ट्रात भ्रष्टाचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी आवर्जुन लक्ष घालावे तसेच असे शिफारसीने आणलेल्या अधिकार्‍यांचा प्रकार कायमस्वरूपी बंद करावे अशी मागणी मुरबाड विकासमंच ट्रस्टच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ नामदेव शेलार ( Mrs.Jyoti Namdev Shelar ) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

Post a comment

 
Top