0
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड |
मुरबाड तालुक्याचे मुख्य म्हणून ग्रामीण रूग्णालय असून या अगोदर ऑपरेशन थिएटर चालू करण्यासाठी आरोग्यमंत्री यांचेकडे मुरबाड विकासमंचाचे अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी मागणी केली होती तद्नंतर स्वतः आरोग्यमीं यांच्यासमवेत लोकप्रतिनिधी यांनी पाहणी करून सौ.ज्योतीतार्इ शेलार यांच्या मागणीची दखल घेतली.तेव्हा ऑपरेशन थिएटर चालू करण्यात आले.3 ते 4 ऑपरेशन नंतर पुन्हा तिच परिस्थिती उद्भवली असून मोठ मोठया मशिनी आहे त्या अवस्थेत पडून आहे.आजतागायत हा विषय धुळखात पडला आहे.त्यामध्ये गलथान कारभार मुरबाड ग्रामीण रूग्णालयात होत असून माहिती अधिकाराखाली माहिती दिली जात नाही,एक्सरे विभागीय अधिकारी रूग्णांना हेळसांड वागणूक देतात,त्याचबरोबर आठवडयातून खाजगी सूट्टी घेतली जात असून याचा फटका मात्र रूग्णांना बसत आहे.10 ते सायं 5 वाजता एक्सरे विभागाचा वेळ असताना वेळेवर एक्सरे विभाग उघडा नसल्याने नागरिकांची गैरसोय होते.जर नागरिकांकडे पैसा असता तर ते खाजगी दवाखान्यात गेले असते परंतू ग्रामीण रूग्णालय परवडणारे जरी असले तेथे सध्या हालाकिचे प्रश्‍न उपस्थित होतांना दिसत आहे.सकाळी वेळे अगोदर आणि संध्याकाळी वेळ संपण्यापुर्वी ग्रामीण रूग्णालय एक्सरे विभाग खुले नसते.याचा फटका  नागरिकांना बसत आहे.मनात येर्इल तेव्हा  येर्इल आणि मनात येर्इल तेव्हा  जाणार असे लक्षण सध्या एक्सरे विभागातून निदर्शनास आले असताना यावर मुरबाड ग्रामीण रूग्णालय अधिक्षीक,वैद्दयकिय अधिक्षीक ठाणे यांनी दुर्लक्ष केल्याने याचा फायदा विभागीय अधिकारी यांनी घेतला आहे.या मनमानी करणार्‍या एक्सरे विभाग  अधिकारी यांचेवर तात्काळ कायदेशीर कारवार्इ करावे अन्यथा महिला संघटना मोर्चे,आंदोलने काढतील असा इशारा  सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी दिला आहे.

Post a comment

 
Top